संपतराव नेते न झाल्यामुळे त्यांनी लोकांना ‘उपकृत’ करण्याचा प्रश्नच आला नाही!
भाई संपतराव पवार यांची जिद्द समजून घेण्यासाठी या आत्मकथनातील सूत्रे लक्षात घेतानाच प्रस्थापिताच्या चिवटपणाची दखल घेणे आवश्यक आहे. कारण या आत्मनिवेदनातून जशी पुरोगामी कार्यकर्त्यांची जिद्द सामोरी येते, तशीच प्रस्थापित शक्तींची टिकून राहण्याची कुवत एक आव्हान म्हणून पुढे येते. त्या आव्हानाचे स्वरूप समजल्याखेरीज या आत्मकथनाचे महत्त्व लक्षात येणार नाही.......